
नागपूर : मिहान प्रकल्पात टाटा एरोनॉटिक, डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेसनंतर आता नागपुरात सुमारे ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागात हेलिकॉप्टर कारखाना उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.