
नागपूर : दुचाकीचालकासह मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. लागलीच कारवाईचा ससेमीरा उगारीत वाहतूक शाखेला दंड वसुलीचे फर्मान दिले गेले आहे. हे फर्मान वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अगदी डोक्यावर घेतल्याचे चित्र आहे. त्यातून थेट कारचालकांना विनाहेल्मेटचे चालान पाठविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक विभागाच्या या चुकीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत असून कारचालकांमध्ये रोष उफाळून आला आहे.