.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Husbunds Girlfriend not Relative Mumbai High Court Nagpur Bench
नागपूर : ‘भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ - अ’ नुसार पती किंवा पतीच्या नातेवाईकांनी महिलेचा छळ केल्यास कौटुंबिक हिंसा म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. प्रेयसी ही पतीची नातेवाईक नाही. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये पतीच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नोंदविले. तसेच, प्रेयसीविरोधात चंद्रपूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा देखील रद्द करण्याचे आदेश दिले.