
नागपूर : आत्महत्येची घटना घडल्यास सहाजिकच ‘त्याने किंवा तिने मृत्यूपूर्वी चिठ्ठीमध्ये काय लिहिले असावे’, असा प्रश्न पडतो. आजवर हे पाऊल उचलण्यामागचे कारण चिठ्ठीतूनच स्पष्ट होत आले आहे. एखाद्या व्यक्तीला त्या आत्महत्येच्या कृत्यासाठी जबाबदार धरले असल्यास किंवा त्यांच्या त्रासातून हे कृत्य केले असल्याचे निदर्शनास आल्यास पोलिस त्या व्यक्तीवर गुन्हादेखील दाखल करतात.