High Court : सुराबर्डी तलाव परिसरातील अतिक्रमण मोजमापाचे काय? उच्च न्यायालयाने पाटबंधारे विकास महामंडळाला मागविले उत्तर
Nagpur News: सुराबर्डी तलावातील अतिक्रमण, प्रदूषण यावर उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत एक आठवड्यात स्पष्टीकरण मागवले आहे. तलाव क्षेत्र निश्चित न झाल्याने अतिक्रमणाचे प्रमाण समजणे कठीण बनले आहे.
नागपूर : सुराबर्डी तलाव परिसराच्या मोजणीसाठी आतापर्यंत कोणती पावले उचलली गेली आहेत, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला (व्हीआयडीसी) याबाबत एका आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले.