
नागपूर : नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) सर्जरी विभागातील निवासी डॉक्टर सुपर स्पेशालिटीच्या नीट परीक्षेत डॉ. यश सुनील कुमार जैन देशात पहिला आला आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे, अशी माहिती मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी दिली.