
अनंत सुपनर
कारंजा : विदर्भाचा गरीब रथ म्हणून ओळख असलेल्या शकुंतलेचे धावणे बंद झाल्याने १०८ वर्षांपूर्वीच्या यवतमाळ-मूर्तिजापूर-अचलपूर नॅरोगेज रेल्वे मार्गावरील स्थानके भकास व ओसाड झाली आहेत. तालुक्याच्या ठिकाणच्या स्थानकांवर फक्त आरक्षण करण्यासाठीची एक खोली कार्यरत दिसत आहे. इतर ठिकाणी तर त्याहून दयनीय अवस्था झालेली दिसत आहे. अशा स्थितीत या रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण होऊन त्यावर पुन्हा रेल्वे केव्हा धावेल, असा येथी नागरिकांचा सवाल आहे.