नागपूर : जातीय सलोख्यामुळे राज्यात शांतता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dilip valse patil

नागपूर : जातीय सलोख्यामुळे राज्यात शांतता

नागपूर : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर देशातील कित्येक राज्यांमध्ये दंगली भडकल्या. दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. परंतु, राज्यात जातीय सलोखा असल्याने कायदा आणि सुव्यस्थेला गालबोट लावणारी एकही घटना घडली नाही, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

गृहमंत्री म्हणाले, काही दिवसांपूर्वी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि दिल्लीतील एका कार्यकर्त्याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर सर्व देशात दंगली सुरू आहेत. याशिवाय ‘अल कायदा’नेही हल्ले करण्याची धमकी दिली आहे. मात्र, संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. समाजातील जवळपास सर्वच नेत्यांशी पोलिस प्रशासन चर्चा करीत आहे. असे असतानाही पोलिस यंत्रणा सज्ज असून अशा कुठल्याही परिस्थितीशी सामना करण्याची तयारी आहे.

नागपुरात अशा कुठल्याही प्रकारची शक्यता नसून पोलिस चांगले काम करीत आहे. अमरावती आणि मालेगाव सारखा पॅटर्न कुठेही घडू नये याची काळजी घेण्यासाठी कठोर कारवाई केली. विशेष म्हणजे पोलिस महासंचालक आणि विविध अधिकाऱ्यांची बैठक घेत चर्चा केली. विशेष म्हणजे दोन्ही गटातील नेत्यांशी चर्चा नियमित सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Home Minister Dilip Walse Patil Speech To Law And Order In Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top