
नागपूर : पन्नाशीकडे झुकलेल्या शालिनी संपतराव खडसे. ना आई, ना बाप ना आयुष्याचा जोडीदार. मानेवाडा परिसरात एका घराच्या कोपऱ्यात रात्रीच्या आश्रयाला असतात. दिवसभर चार बॅगांमध्ये असलेले जग अंगाखाद्यांवर सोबत घेऊन कधी रामदासपेठ तर कधी ग्रेट नागरोडवर भटकंती करतात.