Nagpur Crime News : शहरातील नागरिकांची मालमत्ता असुरक्षित

घरफोडी, दरोडा, लुटण्याच्या घटनांमध्ये सातत्‍याने वाढ
homes unsafe increase in robbery theft case police
homes unsafe increase in robbery theft case policeesakal

Nagpur News : गेल्या वर्षभरात शहरातील गुन्ह्यांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये सर्वाधिक वाढ ही लुटमार, दरोडा आणि घरफोडीमध्ये झाली असून शहरातील नागरिकांची मालमत्ता सुरक्षित आहे का?

असा प्रश्‍न आता नागरिकांना पडला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात ८३६ घरफोडीच्या घटनांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी केवळ ३० टक्के चोऱ्यांचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.

नागपूर महानगर असून दिवसेंदिवस ते विस्तारत आहे. मात्र, वाढत्या शहराप्रमाणे येथील गुन्हेगारीच्या घटनांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. संघटीत गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक असला तरी, मालमत्तेशी निगडीत असलेल्या गुन्ह्यांवर गेल्या काही वर्षांपासून नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना सपेशल अपयश आले आहे.

त्यामुळे सातत्याने लुटमार, दरोडा आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येते. काही विशिष्ठ ठाण्यांच्या परिसरात या घटना सातत्याने घडताना दिसून येतात. दरम्यान याबाबत अनेकदा पोलिस विभागाकडून अभियानही सुरू करण्यात आले.

मात्र, त्याचाही गुन्हेगारांवर परिणाम झाल्याचे दिसून आला नाही. विशेष म्हणजे २०२३ मध्ये जानेवारी ते डिसेंबरच्या दरम्यान १५ दरोडे, २२१ लुटमार आणि ८३६ घरफोडींच्या घटना घडल्या. त्यामुळे नागरिकांच्या कोट्यवधींचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. २०२२ च्या तुलनेत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये ३० टक्क्याने वाढ झाल्याचे दिसून येते.

दृष्टीक्षेपात आकडेवारी २०२३

गुन्हे - घटना - तपास

  • दरोडा - १५ - १५

  • लुटपाट- २२१ -१४८

  • घरफोडी- ८३६ - २५०

बंदोबस्तामुळे पोलिसिंग बंद

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पोलिसांना बंदोबस्त लावण्यात येतो. त्यामुळे ठाण्यामध्ये पोलिस कमीच दिसतात. दुसरीकडे गुन्ह्यांच्या तपासावरही त्याचा मोठा परिणाम होतो. याशिवाय शहरातील बहुतांश ठाण्यांमध्ये २५ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळेही पोलिसींगवर परिणाम होताना दिसून येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com