
मुंबई : नागपूर जिल्ह्यातील बिडगाव येथे शेतकरी रमेश घाटोडे यांच्या निवासस्थानी स्थानिक गुन्हे शाखेच्या (एसीबी) पथकाने अचानक छापा घालून ‘एचटीबीटी’ बियाणे जप्त केले. तसेच त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडीही सुनावण्यात आली. माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.