
नागपूर : गणेशपेठ हद्दीतील आग्याराम देवी मंदिराच्या काही अंतरावर असलेल्या पडीक जागेवरील विहिरीमध्ये मानवी सांगाडा आढळून आला. एक हात आणि डोके गायब आहे. हा प्रकार उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना शुक्रवारी (ता.२९) दुपारी बारा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.