शेतात नेऊन पत्नीवर हल्ला, पतीवर गुन्हा दाखल

crime
crimeMedia Gallery
Updated on

गुमगाव (जि. नागपूर) : दुचाकीवर बसून पती-पत्नी नागपूरहून गुमगाव टी-पॉईंटलगतच्या मावसभावाच्या शेतात आले. गप्पागोष्टी सुरू असतानाच पती-पत्नीमध्ये काही कारणामुळे अचानक वाद झाला. झालेल्या वादात पतीने पत्नीच्या डोक्यावर मोठा दगड मारून रक्तबंबाळ (nagpur crime news) केले. ही घटना हिंगणा पोलिस ठाण्याच्या (hingana police station) हद्दीत गुमगाव शिवारातील पंकज दळवी यांच्या शेतात मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

crime
शेतीच्या वादातून मोठ्या भावाचा खून; लहान भावास अटक

नागपूर येथील भांडेवाडी-पारडी परिसरात राहणारे अनिल राणे आपल्या पत्नीसह (ज्योत्स्ना राणे) दुचाकीने गुमगाव परिसरातील टी-पॉईंट येथील दळवी या मावसभावाच्या शेतात आले. शेतात आल्यानंतर त्यांनी शेतमालक दळवी यांना आवाज दिला. दळवी हे शेतीकामात व्यस्त होते. आवाज आल्यानंतर रस्त्यावरच शेत असल्याने कोणीतरी आले असावे, असा दळवी यांनी विचार केला. शेतीकामात व्यस्त असताना अवघ्या काही क्षणातच दळवी यांना महिलेचा ओरडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने दळवी धावत गेले असता, त्यांना मावसभावाची पत्नी (ज्योत्स्ना) रक्तबंबाळ झालेली दिसली. सोबतच मावसभाऊ अनिल हा शेतातून पळताना दिसला. काही क्षणातच अनिलने दुचाकीवर बसून घटनास्थळावरून पळ काढला. दळवी यांनी लगेच हिंगणा पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सारिन दुर्गे, पोलिस उपनिरीक्षक विनोद नरवाडे, कर्मचारी रवी मदनकर यांनी लगेच घटनास्थळी जाऊन जखमी महिलेला हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आणि तिथून पुढील उपचारासाठी मेडिकल नागपूरला हलविले. हिंगणा पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तपासाचे चक्र फिरवून आरोपी पती अनिल राणेला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिन दुर्गे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक विनोद नरवाडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com