सहा महिन्यांपूर्वी माहेरी गेलेल्या पत्नीच्या विरहात पतीची आत्महत्या

galfas
galfasgalfas
Updated on

नागपूर : दारुच्या व्यसनापायी माहेरी गेलेल्या पत्नीच्या विरहात युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पारडी पोलिस ठाण्यांतर्गत घडली. योगेश मोरेश्वर नागोसे (३२, रा. एकतानगर, भांडेवाडी) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश मोलमजुरी करायचा. यातून मिळालेले पूर्ण पैसे तो दारूत उडवत होता. दारूच्या नशेत तो नेहमी आई-वडील आणि पत्नीशी भांडणही करायचा. त्याच्या सवयीला कंटाळून सहा महिन्यांपूर्वी पत्नी माहेरी निघून गेली. तेव्हापासून तो नैराश्‍यात गेला. तो जास्त प्रमाणात दारू प्यायला लागला.

galfas
ती खोलीत गेली अन् घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली

सोमवारी आई-वडील कामावर गेले होते. दुपारी योगेश घरी एकटाच होता. या दरम्यान त्याने वऱ्हांड्याच्या व्हेंटीलेशन खिडकीला दोरी बांधून गळफास लावला. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आई घरी परतली असता योगेश गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पारडी पोलिस घटनास्थळावर पोहोचले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

बडबड करणाऱ्या बायकोला झोडपले

क्षुल्लक कारणावरून पतीशी वारंवार वाद घालून बडबड करणाऱ्या बायकोला नवऱ्याने चांगले बदडले. तिची दुचाकी जाळून टाकली. ही घटना जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी सुब्बू वहाणे (२२, रा. शिवसुंदरनगर, वाठोडा) याच्या तक्रारीवरून पतीवर गुन्हा नोंदविला आहे. जयंता वसंता वहाणे (२४) असे आरोपीचे नाव आहे.

सुब्बू आणि जयंताच्या लग्नाला काही दिवसच झाले. मात्र, त्यांच्यात घरगुती कारणातून भांडण होत असतात. घरी बायको क्षुल्लक गोष्टीवरून वाद घालून पतीशी भांडत होती. त्यामुळे पती जयंता भांडणादरम्यान सुब्बूला मारहाणही करायचा. त्यामुळे सुब्बू कस्तूरबानगरात राहणाऱ्या बहिणीच्या घरी निघून गेली. सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास जयंता सुब्बूला परत आणायला तिच्या बहिणीकडे गेला. मात्र सुब्बूने त्याच्यासोबत येण्यास नकार दिला.

galfas
विराटचे एकदिवसीय कर्णधारपदही जाणार? बीसीसीआयकडे अनेक पर्याय

यावरून जयंताशी पुन्हा तिने भांडण करीत बडबड केली. त्यामुळे सुब्बूला मारहाण केली आणि तिच्या वडिलांच्या दुचाकीला आग लावली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. जरीपटका पोलिस घटनास्थळावर पोहोचले. जयंतावर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com