esakal | nagpur : आता मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

आता मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीला काँग्रेसचा विरोध आहे. तसे मुख्यमंत्र्यांना कळवण्यात आले होते. पत्रही देण्यात आले होते. यानंतरही तीनचा प्रभाग कायम ठेवला जात असेल तर आम्ही लोकशाही पद्धतीने त्यास विरोध करू असे सांगून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकप्रकारे मुख्यमंत्र्यांना इशाराच दिला.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक किंवा दोन सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करावी या लोकप्रतिनिधींच्या भावना होत्या. महापालिका क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या नागरिकसुद्धा याच मताचे आहेत. या जनभावना आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोचवल्या होत्या. नागपूर शहर काँग्रेसने दोन सदस्यीय प्रभाग पद्धती करण्यात यावी असा ठरावही केला आहे. यानंतरही तीनचा प्रभाग कायम ठेवला जात असल्याचे कळले. त्यामुळे आता विषयावर आपण आता मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार नाही. सरकारच्या निर्णयाला आम्ही लोकशाही पद्धतीने विरोध करणार आहोत. सरकार आणि संघटना वेगवेगळ्या असतात. संघटनेच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये जाऊन संघर्ष करू, असेही पटोले नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले.

देशमुखांचा निर्णय हांडोरे घेतील

माजी आमदार तसेच प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आशिष देशमुख यांच्यावरील आरोपांची काँग्रेसचे प्रभारी चंद्रकांत हांडोरे चौकशी करीत आहेत. ते जो अहवाल सादर करून त्याप्रमाणे योग्य ती कारवाई केली जाईल. आशिष देशमुख यांच्यावर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करीत असल्याचा आरोप आहे. भाजप उमेदवारांसोबत बैठक घेत असल्याचा त्यांना फोटोही समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीने देशमुखांची हकालपट्टी करण्याचा ठराव केला आहे.

आशिष जयस्वाल यांच्यावर ‘नो कमेंट्स’

शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या भाषणाचा व्हीडीओ सध्या चांगलाच गाजत आहे. त्यात त्यांनी काँग्रेसला कुत्र विचारत नव्हते. उद्धव ठाकरे यांनी सत्तेत घेऊन मृत काँग्रेसला जिवंत केल्याचे म्हटले आहे. याबाबत विचारणा करण्यात आली असताना नाना पटोले यांनी ‘नो कॉमेंट्स’ म्हणत या विषयावर भाष्य करण्यास टाळले.

loading image
go to top