

नागपूर : जयताळ्यात १६ आणि १४ वर्षाच्या दोन सख्ख्या बहिणींना पळवून नेणाऱ्या दोन आरोपींना प्रतापनगर पोलिसांनी अटक केली. अजय रामसिंग वरखडे (२८) आणि नागेश उर्फ नाग्या खुशाल उमप (२०, रा. जयताळा झोपडपट्टी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अजय वरखडे हा कुख्यात घरफोड्या आहे. अजयच्या घरी नागेश उमप हा भाड्याने राहतो. अजय हा विवाहित असून त्याच्या पत्नीचे निधन झाल्याची माहिती आहे. त्याच्या शेजारी बहिणी आईवडिलांसह राहत होत्या. १६ वर्षीय मोठ्या बहिणीला अजयने जाळ्यात ओढले. घरफोडी करून मिळवलेला पैसा तो प्रेयसीवर खर्च करीत होता. तसेच मोठ्या बहिणीने तिच्या लहान बहिणीची ओळख अजयशी करून दिली होती.
त्यानंतर दोघीही बहिणी त्या दोघांसोबत फिरायला, पार्टीला किंवा खरेदीला जाऊ लागल्या. अजय विवाहित असल्यामुळे तो लग्न करू शकत नव्हता, हे माहिती असल्यामुळे त्याने प्रेयसीला पळवून नेण्याचा प्लॅन आखला. नाग्या पळून जायला तयार नसतानाही त्याला प्रेयसीच्या बहिणीकडून पळून जाण्यास तयार केले.
साखरचा बहाणा
गेल्या १२ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास दुकानातून साखर आणायला जाते, असे सांगून दोघी घरून निघाल्या. त्यानंतर त्या घरी आल्याच नाही. बराच वेळ होऊनही मुली घरी न आल्याने त्यांच्या आईवडिलांनी त्यांचा शोध घेतला. त्यातच अजय आणि नाग्या हे देखील वस्तीतून बेपत्ता असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
अजयच्या सासरी सापडल्या
अजयच्या पत्नीचे माहेर बरगड (सिवनी) येथे पत्नी मृत झाल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी पोलिसांचे एक पथक बरगडला रवाना झाले. त्यात दोन्ही मुली आणि आरोपी हे एका घरात आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन नागपूरला घेऊन नागपूरला आणले. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर विनयभंग आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. एवढ्या दिवस दोन्ही मुली आरोपींसोबत होत्या. त्यामुळे मुलींवर बलात्कार झाल्याचा संशय असून पोलिस तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.