
बुटीबोरी : नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवैध व्यवसायांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौजा बोरखेडी-जंगेश्वर येथे रविवारी (ता.९) प्रतिबंधित सव्वा दहा लाख रुपये किमतीचे संकरित कपाशी बियाणे जप्त करण्यात आले. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.