नागपूर : शहरात चोरांचा सुळसुळाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर शहरात चोरट्यांचा उच्छाद.

नागपूर : शहरात चोरांचा सुळसुळाट

नागपूर - शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरांचा सुळसुळाट वाढला असून गेल्या तीन दिवसात पाच घरफोड्या आणि सहा चोरींच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. पहिल्या घटनेत गुरुदेवनगरात वास्तव्यास असलेले लाला रामनिवास दुबे (वय ३७ ) यांचे सासरे वैकुंठप्रसाद ताराप्रसाद पांडे (वय ६०, रा. स्वागत नगर हे परिवारासह २६ ते २८ एप्रिलदरम्यान बाहेरगावी गेले होते.

यादरम्यान चोराने घराच्या दाराची कडी तोडून आत प्रवेश केला. त्याने अलमारीतून रोख ८० हजार आणि व सोन्याचांदीचे दागीने असा एकूण ४ लाख ३० हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. दुसऱ्या घटनेत शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास महालक्ष्मीनगर येथे राहणारे प्रफुल्ल बाबुरावजी दातीर (वय ४३) हे घरी परिवारासह हॉलमध्ये झोपले होते. यादरम्यान घराच्या मागच्या बाथरुममधून चोराने घरात प्रवेश करून १९ हजार ८५० रुपये रोख व एक मोबाईल सोन्याचांदीचे दागीने असा एकूण ३ लाख ३६ हजार ६१० रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला.

Web Title: Increase Theft In Nagpur City

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nagpurpolicecrimerobbery
go to top