असं काय झालं! अचानक कामठीच्या नागरिकांची वाढली डोकेदुखी, मळमळ

file
file

कामठी (जि.नागपूर) : एक तर कोरोना महामारीचा काळ; घरोघरी जीवनमरणाचा प्रश्‍न, आरोग्याची काळजी, शहरातील दिवसेंदिवस वाढत जाणारी मृतांची संख्या आणि त्यावर मानवनिर्मीत डोकेदुखी वाढविणारे प्रश्‍न, काय करावे, कुणाकडे तक्रार करावी विचार करताना होणारी मळमळ कामठीवासींसाठी नकोशी झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या अव्वल असलेला हा तालुका नगरप्रशासनाच्या दृष्टीतून उपेक्षेचा ठरत आहे, अशी चिंता रहिवाशांना सतावित आहे.

अधिक वाचाः लग्न करतो म्हणाला, ऐनवेळी दिला दगा

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न
 सध्या स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाला महत्व दिले जात आहे. परंतू या कृतीला कामठी नगर पालिकेमध्ये मात्र छेद दिला जात आहे. याला कारणही तसेच आहे. कामठी शहरातील घनकचरा गोळा करण्याचा प्रश्‍न निकाली निघाल्यानंतर आता नवी समस्या समोर आली आहे. हा घनकचरा आता रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जिवावर उठला आहे. शहराबाहेर असलेल्या डंपिंग यार्डच्या परिसरात हा घनकचरा न टाकता बाजूलाच आजनी गादा रोडवर हा घनकचरा टाकला जात असून एवढेच नव्हे तर मेलेली जनावरेसुध्दा रस्त्यावर टाकली जात असल्याने आजनी गादा गावातील कामठी शहरात येत असलेल्या नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. त्यांना ओका-या व मळमळ आणि डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागत आहे. कामठी नगर पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करूनही याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
अधिक वाचाः हे विघ्नहर्ता, बाप्पा ! आतातरी कापसाचे पैसे खात्यात जमा होऊ द्या ना !
 

१८ लाख खर्चूनही प्रकल्प अपूर्ण
कामठी शहराचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी कामठी शहराबाहेरील आजनी गादा रोडवरील राणीतलाव मोक्षधामच्या मागील बाजूस काही वर्षापूर्वी तत्कालीन नगरपालिका प्रशासनाने नियमाला बगल देत घनकचरा प्रकल्प उभारले. बाराव्या वित्त आयोगातून हा प्रकल्प उभारण्यास मंजूरी देण्यात आली होती. याकरीता त्यावेळी १८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. हा निधी खचीर्ही घालण्यात आला, परंतू अद्याप हा प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही. कामठी शहरातील विविध वार्डांमधून घंटागाडीच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेला ओला व सुखा कचरा जमा करून या कच-यावर येथे प्रक्रिया करण्यात येणार होती. या प्रकल्पासाठी त्याठिकाणी एक कार्यालय सुध्दा तयार करण्यात आले. मात्र, शहर स्वच्छ करण्यासाठी ज्या प्रकल्पाचे कार्यालय करण्यात आले, तेथेच मोठया प्रमाणात घनकचरा साचल्याचे दिसून येत आहे. या इमारतीचा काहीही उपयोग होताना दिसून येत नाही. त्यामुळे त्या प्रकल्पाचे अस्तित्वच आता धोक्यात आले आहे. या जागेवर शहरातील जमा केलेल्या कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट न लावता आजनी गादा रोडवरच हा कचरा टाकण्यात येत असून मेलेली जनावरेसुध्दा रस्त्यांवर टाकली जात आहेत.

हेही वाचाः दिलासादायक! कामठीत ८५ टक्के बाधित रुग्णांनी केली

नागरिकांसमोर उभा राहिला प्रश्‍न
आजनी मार्गावर रस्त्याच्या बाजूला कचऱ्यासोबत मेलेली जनावरेही टाकण्यात येत असून याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा नागरिकांना त्रास होत असून या दुर्गंधीमुळे मळमळ व डोके दुखत असते, तर अनेकांना आजाराची लागणसुध्दा झालेली आहे.
 लिलाधर दवंडे, सामाजिक कार्यकर्ते, आजनी

पत्रव्यवहार करूनही उपयोग नाही
डंपिंग यार्डचा कचरा आजनी गादा रोडवर टाकत असल्यामुळे गावातील विद्यार्थी तसेच नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यामुळे कामठी नगर पालिका प्रशासनाकडे अनेकवेळा यासंदर्भात पत्रव्यवहार केला. परंतू पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
सुनील मेश्राम, सरपंच, आजनी

संपादन  : विजयकुमार राऊत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com