Cotton price : शेतीवरील वाढत्या खर्चाने मोडले कंबरडे...किलोला १० रुपये देऊनही मजूर मिळेना
Agriculture News : कापूस लागवडीचे खर्च वाढले असून, कापसाच्या दरात सातत्याने घट होण्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक अडचणी येत आहेत. व्यापारी व शेतकरी दोघेही सद्या नाईलाजाचे जीवन जगत आहेत.
कामठी : तालुक्यात कपाशीचे मुख्य पीक घेतले जाते. मात्र दरवर्षी लागवड खर्चात मोठी वाढ होऊन कपाशीच्या दरामागची साडेसाती काही संपली नाही. यामुळे साहेब जगायचे कसे, असा प्रश्न शेतकरी विचारू लागला आहे.