Nagpur : वाढता लठ्ठपणा मधुमेह वाढविण्यास कारणीभूत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diabetes

वाढता लठ्ठपणा मधुमेह वाढविण्यास कारणीभूत

नंदोरी : गत काही वर्षांत बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. बदलती जीवनशैली आणि संतुलित आहार, व्यायाम, औषधोपचाराकडे दुर्लक्ष, वाढत्या लठ्ठपणामुळे मधुमेह रुग्णसंख्या वाढण्यास कारणीभूत ठरतोय. त्यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणावर नियंत्रण मिळविणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भारतात दरवर्षी १० लाखांहून अधिक लोकांचा मधुमेहामुळे मृत्यू होतो आहे. गत ३० वर्षांत मधुमेह भारतात मृत्यूचे सातवे कारण ठरते आहे.

आंतरराष्ट्रीय मधुमेह प्राधिकरण या संस्थेद्वारे १९९१ मध्ये ही संकल्पना राबविण्यात आली. १९२२ मध्ये चार्ल्स बेस्ट यांच्या सोबत सर फ्रेडरिक बॅटिंग यांनी इन्शुलिनचा शोध सर बॅटिंग यांच्या शंभराव्या जन्मदिना दिवशी 'जागतिक मधुमेह दिवस 'या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रत्येक बारा व्यक्तीमागे एक जण मधुमेहाचा शिकार आहे. ही संख्या भयावह असून मधूमेहामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मधुमेहामुळे हृदयरोग, किडनीचा आजार तसेच डोळ्यांच्या समस्या निर्माण होत आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवणे शक्य असून त्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे.

इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनच्या २०१७ च्या अहवालानुसार जगभरात मधुमेहाचे ७ कोटींहून अधिक रुग्ण आहे. २०३४ पर्यंत जगभरात १३ कोटींहून अधिक रुग्ण असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मधुमेहाची पातळी एक टक्क्यांनीही कमी केली तरी मधुमेह नियंत्रणात राहू शकतो. त्यामुळे पॅरालिसिसचा धोका १२ टक्के, हार्ट अॅटॅकचा धोका १४ टक्के, किडनीचे आजार ३३ टक्के तर मधुमेहामुळे अवयव कापण्याच्या शक्यतेत ४३ टक्के कमी होऊ शकतात.

मधुमेह येण्याआधी टाळा

एकविसावे शतक मधुमेह व लठ्ठपणा असे डायबेसिटीचे युग आहे. मधुमेहाचे दोन प्रकार आहेत. पहिला शरीरात इन्सुलीनच्या हार्मोन्सची उत्पत्तीच होत नाही आणि दुसरा इन्सुलीनची उत्पत्ती होते; परंत, त्याची कार्यक्षमता कमी असते. दुसऱ्या प्रकारचा मधुमेह आता प्राैढच नव्हे तर लहान मुलांतही आढळून येत आहे. जगात चीननंतर भारतात सर्वाधिक मधुमह रुग्ण आहेत. ६९ दशलक्ष लोक मधुमेहग्रस्त आहेत. त्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे वाढत जाणारा बालवयातील लठ्ठपणा आहे. बालवयातील लठ्ठपणामध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्राैढांच्या तुलनेत बालमधुमेहींमध्ये दुसऱ्या प्रकारचा मधुमेह आव्हानात्मक आणि हानिकारक आहे. त्यामुळे तो येण्याआधी टाळला पाहीजे.

लठ्ठपणावर नियंत्रण गरजेचे

सद्य:स्थितीत मधुमेहाचे प्रमाण १० टक्के आहे; पण त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. साठ टक्के मधुमेही रुग्णांना मेटॅबाॅलिक सिन्ड्रोम आहे. वाढते वजन त्याला कारणीभूत ठरताना दिसते. योग्य आहार, पथ्य, व्यायाम, नियमित औषधोपचार गरजेचा आहे. लठ्ठपणा वाढू न दिल्यास मधुमेहही नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. कोरोना काळात मधुमेह असलेल्या रुग्णांना संसर्ग होणार नाही यासाठी मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर या प्रतिबंधक उपाययोजनांकडे प्रत्येकाने कटाक्षाने लक्ष देण्याची आहे.

loading image
go to top