Nagpur Airport: इंडिगो विमानाचा पहिला लॅंडिंगचा प्रयत्न अयशस्वी
IndiGo: नागपूर विमानतळावर इंडिगोच्या मुंबई-नागपूर फ्लाइटने पहिला लॅंडिंगचा प्रयत्न कमी दृष्यमानतेमुळे अयशस्वी झाला. दुसऱ्या प्रयत्नात १५ मिनिटांनी विमान सुरक्षितपणे लँड झाले.
नागपूर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दृष्यमानता कमी असल्याने इंडिगोचे मुंबईहून शनिवारी सकाळी ७.३५ वाजता उतरणाऱ्या विमानाचा पहिला लॅंडिंगचा प्रयत्न अपयशी ठरला. मात्र दुसऱ्या प्रयत्नात १५ मिनिटांनंतर उशिराने हे विमान उतरले.