Flight Ticket Prices :दिवाळीपूर्वी विमान प्रवास महागला; इंडिगोचा फ्यूल चार्ज वाढला ; प्रमुख मार्गांवरील तिकिट दर वाढण्याची शक्यता

IndiGo Fuel Surcharge Hike, Nagpur Flight Ticket Prices Rise. नव्या बुकिंगसाठी इंडिगोने देशांतर्गत विमान प्रवासावर अंतरानुसार ३७५ ते १,३०० रुपयांपर्यंत अतिरिक्त इंधन अधिभार लागू केला आहे. सणासुदीच्या काळात विमान तिकिटांचे दर वाढण्याची शक्यता आहे.
IndiGo Increases Fuel Surcharge on Domestic Flight Bookings

IndiGo Increases Fuel Surcharge on Domestic Flight Bookings

esakal

Updated on: 

नागपूर: सणासुदीच्या काळात घरी येणाऱ्या नागपूरकर विमान प्रवाशांच्या खिशावर आता आणखी भार पडणार आहे. इंडिगोने आजपासून नव्या बुकिंगसाठी इंधन अधिभारात (फ्यूल चार्ज) वाढ केली आहे.

देशांतर्गत विमान प्रवासाच्या अंतरानुसार आता ३७५ ते १,३०० रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. याचा परिणाम नागपूरहून दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आणि कोलकाता या प्रमुख मार्गांवर होणार आहे. विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ)च्या वाढलेल्या किमतीमुळे परिचालन खर्च वाढल्याचे कारण इंडिगोने दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com