esakal | महागाई वाढणार! डिझेल शंभरीकडे; पेट्रोल ११० रुपयांवर | Petrol And Diesel News
sakal

बोलून बातमी शोधा

petrol

महागाई वाढणार! डिझेल शंभरीकडे; पेट्रोल ११० रुपयांवर

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर : पेट्रोलच्या दरांनी चार महिन्यांपूर्वीच शंभरी गाठल्यानंतर आता डिझेलदेखील शंभरीकडे जात आहे. इंधनदरांनी नवी उंची गाठली आहे. यामुळे आता भाजीपाला, धान्य आणि इतर वस्तू महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय दिवाळीच्या तोंडावर डिझेलच्या दरात वाढ झाल्याने प्रवासही महागणार असल्याने बाहेर जाण्याचे अनेकांचे बजेट बिघडले आहे.

दिनांक - पेट्रोल - डिझेल (प्रति लिटर)

१ ऑक्टोबर -१०७.७३ -९६.१८

२ ऑक्टोबर - १०८.३२ - ९६.८३

३ ऑक्टोबर - १०८.५६ - ९७.१२

४ ऑक्टोबर १०८.८२ - ९७.३४

५ ऑक्टोबर - १०९.०२ - ९७.७५

८ ऑक्टोबर - १०९.३२- ९८.२०

९ ऑक्टोबर - १०९.५६ - ९८.५७

१० ऑक्टोबर - १०९. ८३ - ९८.९३

११ ऑक्टोबर ११०.१४ - ९९.२५

तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलचे दर २५, तर डिझेलचे दर ३२ पैशांनी वाढवले. यामुळे एकीकडे पेट्रोल ११०.१४ रुपयांवर गेले आहे. दुसरीकडे डिझेलने ९९.२५ रुपये प्रतिलिटरचा उच्चांक गाठला. डिझेलचे दर उच्चांकाकडे जात असल्याने आता वस्तू महागण्याची शक्यता आहे. अकरा दिवसांत डिझेल ३.०७ रुपयांनी महागले आहे. पेट्रोल २.१४ रुपयांनी वधारले आहे. यामुळे सर्वसामान्य वाहन चालक चांगलेच त्रस्त झाले आहे.

दळणवळणासाठी सर्वाधिक वाहनांचा वापर केला जातो. वाहतूक करणारे सर्व ट्रक, टेम्पो, माल वाहतूक गाड्या या डिझेलवर चालतात. डिझेल मालवाहतूक गाड्यांचा मायलेज हा जेमतेम १२ ते १४ किमी प्रतिलिटर असतो. आता डिझेलच्या दरात वाढ झाल्याने मालवाहतूक महागली आहे. टाळेबंदीमुळे बरेच दिवस मालवाहतूक बंद असल्याने त्याची स्थिती गंभीर झालेली आहे.

हेही वाचा: नुसता दुधाचा चहा पिताय? जाणून घ्या होणारे नुकसान

त्यात आता डिझेलच्या दरात वाढ झाल्याने मालवाहतूकचे दर वाढणार आहे. त्याचा फटका ग्राहकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरांना बसणार आहे. परिणामी महागाई वाढण्याचे संकेत मिळू लागले आहेत. दिवाळीच्या तोंडावर महागाईची चटका आता बसणार हे निश्चित झाले आहे.

दिनांक - पेट्रोल - डिझेल (प्रति लिटर)

  • १ ऑक्टोबर -१०७.७३ -९६.१८

  • २ ऑक्टोबर - १०८.३२ - ९६.८३

  • ३ ऑक्टोबर - १०८.५६ - ९७.१२

  • ४ ऑक्टोबर १०८.८२ - ९७.३४

  • ५ ऑक्टोबर - १०९.०२ - ९७.७५

  • ८ ऑक्टोबर - १०९.३२- ९८.२०

  • ९ ऑक्टोबर - १०९.५६ - ९८.५७

  • १० ऑक्टोबर - १०९. ८३ - ९८.९३

  • ११ ऑक्टोबर ११०.१४ - ९९.२५

loading image
go to top