Maharashtra Politics : अन्यथा जशास तसे उत्तर दे; सुधांशू मोहोड, संभाजी ब्रिगेडचा पत्रकार परिषदेत इशारा
Sambhaji Brigade’s Political Alert : प्रवीण गायकवाड यांच्यावर भाजप पदाधिकाऱ्यांकडून शाईफेक करत भ्याड हल्ला करण्यात आला. सरकार कारवाई करत नसल्याने संभाजी ब्रिगेडने जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.
Sambhaji Brigade to Retaliate if Provoked: Mohodesakal
नागपूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर १३ जुलैला अक्कलकोट येथे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक सीताराम काटे व त्याच्या साथीदारांनी पूर्वनियोजितपणे शाईफेक करून भ्याड हल्ल्याचा प्रयत्न केला.