नागपूर - अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्याचे वय म्हणजे विशी-बाविशीचे. मात्र नोकरीतून निवृत्त झाल्यावर वयाच्या साठीमध्ये अभिनय क्षेत्रात काहीतरी करून दाखविण्याच्या मिषाने मुंबईत स्थायिक झालेल्या अविनाश वेखंडे या अवलिया कलाकाराने मंगळवारी ‘सकाळ’ कार्यालयाला भेट देत ‘सकाळ संवाद’मध्ये त्यांचा अभिनय प्रवास सांगितला.