उन्हाळ्याची चाहुल लागली असून, महत्त्वपूर्ण कामांसाठी विद्यार्थी, शेतकरी तसेच नागरीकांना दुरवर तालुक्याच्या ठिकाणी जावून कामे करावी लागत आहेत.
Pandhari Internet Service : पांढरी येथे ग्रामपंचायत (Pandhari Gram Panchayat), तलाठी कार्यालय, बॅंका, प्राथमिक शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी केंद्रे, सेतू केंद्रे, शासकीय धान खरेदी केंद्रे, डाकघर, सेवा सहकारी संस्था, पतसंस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच अन्य शासकीय, निमशासकीय कार्यालये आहेत. पण इंटरनेट (Internet Service) व मोबाइल कव्हरेजच्या असुविधेमुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
उन्हाळ्याची चाहुल लागली असून, महत्त्वपूर्ण कामांसाठी विद्यार्थी, शेतकरी तसेच नागरीकांना दुरवर तालुक्याच्या ठिकाणी जावून कामे करावी लागत आहेत. जी कामे गावांमध्येच होत असत, ती कामे सध्या कव्हरेज व इंटरनेटअभावी आता Institute मध्ये जाऊन करावी लागत आहेत. त्यामुळे अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयीन कामे व शासकीय योजनेचे फ़ार्म भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने नागरिकांचा संपूर्ण दिवस वाया जातो. आधी पांढरी येथे फक्त बीएसएनएलची सुविधा सुरळीत सुरू होती.