
बाळापूर : प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूती दरम्यान एका नवजात बाळाचा हात मोडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणाची जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी गंभीर दखल घेतली असून, याबाबत सविस्तर अहवाल मागीतला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्य विभागाच्या चार समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. आरोग्य केंद्रातील काही जणांवर कारवाईची टांगती तलवार आहे.