

Crop Insurance Delay Pushes Narkhed Farmers into Financial Crisis
Sakal
-मनोज खुटाटे
नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना दिलासा देण्याऐवजी चिंतेचा विषय ठरत आहे. हेक्टरी १७ हजार रुपयांची मदत जाहीर होऊन तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला असला, तरी तालुक्यातील तब्बल ११,८५६ शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप रुपयाही जमा झालेला नाही. कापणी प्रयोग पूर्ण झाले, नुकसानही निश्चित झाले, तरीही भरपाई रखडल्याने शेतकरी आर्थिक कात्रीत सापडले आहेत.