
नागपूर : उपराजधानीत असंख्य गुणवान खेळाडू आहेत. मात्र कधी आर्थिक परिस्थिती किंवा कधी पायाभूत सुविधांच्या अभावी ते गरुडझेप घेऊ शकत नाहीत. दिव्यांग तिरंदाज इस्थर कुजुर अशाच कमनशिबी खेळाडूंपैकी एक आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या इस्थरला २०२८ मध्ये होणाऱ्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा व स्वप्न आहे. मात्र गरिबीपुढे आता तिनेही हात टेकले आहे.