P. Veeramuthuvel  : २०४० मध्ये पहिला भारतीय ठेवणार चंद्रावर पाऊल - पी. वीरामुथुवेल

पी. वीरामुथुवेल ः २०३५ पर्यंत अंतराळ स्थानकाची निर्मिती करणार
P. Veeramuthuvel 
P. Veeramuthuvel SAkal
Updated on

नागपूर : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)द्वारे तांत्रिकदृष्ट्या सक्षम असून २०४० पर्यंत पहिला भारतीय चंद्रावर पाऊल ठेवणार असून त्यासाठी इस्त्रोने तयारी सुरू केल्याची माहिती चंद्रयान-३ मोहिमेचे प्रकल्प संचालक पी. वीरामुथुवेल यांनी दिली.

विश्‍वेश्‍वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेच्या वतीने गुरुवारी आयोजित ‘अंतराळ दिन’ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमात व्हीएनआयटीचे संचालक डॉ. परीमल पटेल उपस्थित होते. पी. वीरामुथुवेल म्हणाले, जगातील सर्व देश चंद्रावर उतरण्यासाठी स्पर्धेत उतरले आहेत. चंद्राबाबत जगभरातील देशांची उत्सुकता वाढली आहे.

अमेरिका, चीन २०३६ पर्यंत चंद्रावर तळ ठोकण्याच्या तयारीत आहे. भारतही आता चंद्रावर मनुष्याला उतरवण्याच्या स्पर्धेत कुठेही मागे नसून त्यासंदर्भातील प्रकल्पाची घोषणा केली आहे. इस्त्रोने त्यादिशेने काम सुरू केले आहे.

P. Veeramuthuvel 
NASA-ISRO ISS Mission: नासा आणि इस्रोचे अंतराळ मिशन; पण चर्चा फक्त ग्रुप कॅप्टनचीच, कोण आहेत गगनयात्री शुभांशु शुक्ला?

गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ‘चंद्रयान -३’ मोहिमेअंतर्गत चंद्रावर यशस्वीरित्या लॅंन्डिग करण्यात आले. यावेळी ज्या चुका झाल्यात त्या वेगवेगळ्या पातळीवर सोडविण्यासाठी एक नियोजनबद्ध योजना तयार करण्यात आली.

त्यानुसार यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘चंद्रयान -३’ चे यशस्वी लॅंन्डिग करण्यात आले. त्यामुळे आता इस्त्रोच्या माध्यमातून २०४० पर्यंत भारतीय नागरिक चंद्रावर यशस्वीरित्या पाऊल ठेवणार आहे.

P. Veeramuthuvel 
ISRO Space Mission: इस्रो स्पेस मिशनसाठी सज्ज! स्वातंत्र्यदिनाला लाँच करणार SSLV उपग्रह,यंदाची मोहीम एवढी खास का?

ती मोहीमही इस्त्रो यशस्वी करेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी गगनयान मोहीम सुरू केल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने २०३५ पर्यंत अंतराळात देशाचे पहिले अंतराळ स्थानक स्थापन करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

तर चंद्रावर अंतराळवीराचे १५ दिवस वास्तव्य

इस्त्रोकडून मानवी चंद्र मोहिमेसाठी प्राथमिक काम सुरू करण्यात आले आहे. इस्रोचे मानवी अंतराळ उड्डाण केंद्र, गगनयान आदींचे मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेसाठी काम करीत आहे. भारताच्या ‘स्पेस स्टेशन प्रोग्राम’मध्ये अंतराळवीरांना १५ ते २० दिवस कक्षेत राहू देण्याची योजना आहे. सध्या ते संकल्पनात्मक टप्प्यात आहे, असे पी. वीरामुथुवेल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com