Nagpur District News: रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला आणखीन एकाचा जीव; अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Accident in Jalalkheda Road Due to Potholesकाटोल–वरूड महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रतिक निकोसे यांचा मृत्यू झाला. अपघात, रस्त्यावरील खड्डे, प्रशासनाची दुर्लक्ष ही प्रमुख समस्या.
Nagpur District News

Nagpur District News

esakal

Updated on

जलालखेडा: काटोल ते वरूड महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांनी आणखीन एकाचा जीव घेतल्याची घटना शुक्रवारी (ता.२७) रात्री ८.१५ च्या दरम्यान घडली. अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा शनिवारी (ता.२८) दुपारी २ वाजता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. प्रतीक पांडुरंग निकोसे (वय ४२, रा. जलालखेडा असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

काटोल ते वरूड या रस्त्याचे सिमेंटिकरणाचे काम पूर्ण होऊन ३ वर्ष पूर्ण झाले असून सुद्धा त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहे. रस्त्यावर पडलेल्या भेगामुळे अनेकाना आपला जीव गमवावा लागला आहे. सकाळने या आधीच अशी संभावना दर्शविली होती, पण प्रशासनाने कोणतीच खबरदारी घेतली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com