Nagpur News : जलालखेडा येथील ‘ वॉटर फिल्टर’ शोभेची वस्तू

Water Filter : तीन प्लांट बांधून तयार, पण त्यात पाणीच नाही
जलालखेडा येथे लाखो रुपये खर्च करून तीन आरो एटीम  प्लँट लावले. उन्हाळा संपत देखील आला तरीही आरो सुरु झालेले नाहीत.
जलालखेडा येथे लाखो रुपये खर्च करून तीन आरो एटीम प्लँट लावले. उन्हाळा संपत देखील आला तरीही आरो सुरु झालेले नाहीत. esakal

Nagpur : नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाने जलालखेडा येथे लाखो रुपये खर्च करून तीन आरो एटीम प्लँट लावले. परंतु उन्हाळा लागून दोन महिने झाले असून आता उन्हाळा संपत देखील आला तरीही आरो सुरु झालेले नाहीत. हे तीन ही आरो एटीएम बंद असून शोभेची वस्तू बनले आहे.

जलालखेडा येथे जिल्हा परिषद निधीतून ग्रामपंचायतसमोर एक प्लँट दोन वर्षाअगोदर बांधण्यात आला होता. ते बंद पडून असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. तसेच नायब तहसील कार्यालयाजवळ बांधण्यात आलेल्या आरो प्लँटचे उद्घाटन आमदार अनिल देशमुख यांच्या हस्ते फेब्रुवारी महिन्यात करण्यात आले होते. तेही ‘आरो’ बंद पडले असून शोभेची वस्तू दिसत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

प्लांट चालू करायचा नव्हता तर उद्घाटन केलेच काशाला ? बंद असलेले प्लांट सुरु करण्यास व जनतेला थंड पाणी उपलब्ध करून देण्यास ना ग्रामपंचायतने प्रयत्न केले न जनतेने प्लँट सुरु करण्याची मागणी केली. परिणामी गावातील तीन आरो प्लँट बंद पडलेले दिसून येत आहे.

जलालखेडा येथे लाखो रुपये खर्च करून तीन आरो एटीम  प्लँट लावले. उन्हाळा संपत देखील आला तरीही आरो सुरु झालेले नाहीत.
Nagpur Rain Update : वीज पडून दोन भाविकांचा मृत्यू; काटोल तालुक्यातील आलागोंदी येथील घटना

पाच रुपयात वीस लिटर शुद्ध फिल्टर पाणी मिळणार म्हणून नागरिकांनी या योजनेचे स्वागत केले होते. परंतु लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतने याकडे दुर्लक्ष केले. परिणाम स्वरूप नागरिकांना भर उन्हाळात थंड आरोचे पाणी पिण्यास मिळाले नाही, असे दिसून आले.

नायब तहसील कार्यालयाजवळ नव्याने बांधण्यात आलेला आरो प्लँटचे उद्घाटन हे फेब्रुवारीमध्ये झाले असून ते चालू झाले पाहिजे होते. पण ते चालू झाले नाही. मी त्याचा पाठपुरावा करत असून ते लवकरात लवकर चालू होऊन नागरिकांना फिल्टरचे थंड पाणी पिण्याचा लाभ घेता येईल.

-मयूर सोनोने, उपसरपंच, ग्रामपंचायत जलालखेडा

तहसील कार्यालया जवळच्या ‘आरो’चे काम पूर्ण झले आहे. त्यामध्ये मीटर लावण्याची गरज आहे. ते मीटर एक दोन दिवसामध्ये लागून जाईल व आरो एटीएम वाटर फिल्टर सुरु होऊन जाईल.

-कैलाश निकोसे, सरपंच, ग्रामपंचायत जलालखेडा

जलालखेडा येथे लाखो रुपये खर्च करून तीन आरो एटीम  प्लँट लावले. उन्हाळा संपत देखील आला तरीही आरो सुरु झालेले नाहीत.
Nagpur Water Purifier: जलशुद्धीकरण यंत्र ठरतेय पांढरा हत्ती! ४८ लाखांचा खर्च गेला पाण्यात, यंत्र दोन वर्षांपासून बंद

जलालखेडा येथे तीन पाण्याचे एटीएम असले तरी दोन कोणत्या विभागाकडे याची माहिती नाही. तर एटीएम हे आपल्या विभागाने तयार केले असून त्याची चाचणी ही घेण्यात आली आहे. आता ते का बंद आहे. याची माहिती घेऊन ते सुरू करण्यात येईल.

-प्रशांत बावणे, उपविभागीय अभियंता,

पाणी पुरवठा विभाग, काटोल

एका आरो प्लँटचे विजचे काम पूर्ण झाले नाही. ते काम कोणाकडे आहे तर बघतो आणि लवकरात लवकर प्लांट सुरु करायला लावले जाईल.

-बाबाराव गोरे, सचिव, ग्रामपंचायत जलालखेडा

जलालखेडा येथे लाखो रुपये खर्च करून तीन आरो एटीम  प्लँट लावले. उन्हाळा संपत देखील आला तरीही आरो सुरु झालेले नाहीत.
Nagpur Water Pollution: अर्ध्या नागपूरचे आरोग्य धोक्यात ! कन्हान नदी सर्वाधिक प्रदूषित, पाणी पिणे अपायकारक

जलालखेडा येथील उभारण्यात आलेले तीन ही पाण्याचे एटीएम हे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडूनच आले आहे. एकाचे काम पूर्ण झाले तर दोन चे काम सुरू आहे.

-गाढवे, कनिष्ठ अभियंता, पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद

आमदारांची सभा आहे म्हणून रात्रीच्या दीड वाजता येऊन ठेकेदारांकडून आरो एटीएमची फिटिंग करण्यात आली. पण उन्हाळा संपत आला तरी आरो प्लँट सुरू झाला नाही. आता हा ठेकेदार पावसाळ्यात गावकऱ्यांना थंड पाणी पाजतो की काय, असा सवाल गावकरी ग्रामपंचायतला विचारात आहे. आज करतो उद्या करतो म्हणून नुसती दिशाभूल करण्यात आली.

-मयूर दंढारे, जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा तथा ग्रामपंचायत सदस्य जलालखेडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com