नागपूर - वडील सुतारकाम, आई टेलरिंगचे काम करते. त्यांनी मर्यादित उत्पन्न असूनही आपल्या दोन्ही मुलींसाठी कधीही अपुरेपणा जाणवू दिला नाही. अशा साध्या कुटुंबातील जान्हवी आणि हिमांशी बावणे या भगिनींनी अॅथलेटिक्सच्या मैदानात राष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेतली असून, आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे त्यांचे स्वप्न आहे.