Nagpur Crime : सराफा व्यापाऱ्याला १.६ कोटीने गंडविले; उधारीवर घेतले दागिने, पैसे मागितल्यावर दिली धमकी

एका मोठ्या सराफा व्यापाऱ्याला ठकबाजाने १ कोटी ६ लाख ४४ हजार रुपयांनी गंडविल्याची घटना आली समोर.
cheat
cheatsakal
Updated on

नागपूर - शहरातील शंकरनगर परिसरात असलेल्या एका मोठ्या सराफा व्यापाऱ्याला ठकबाजाने १ कोटी ६ लाख ४४ हजार रुपयांनी गंडविल्याची घटना समोर आली आहे. यापूर्वी या ठकबाजाने प्रतापनगरातील एका सराफा व्यापाऱ्यालाही गंडविल्याची तक्रार प्रतापनगर पोलिस ठाण्याच दाखल करण्यात आली आहे. अविश अशोक वस्तानी (३६, रा. शिवाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

राहुलकुमार नरेशचंद्र खाबिया ऊर्फ जैन (रा. नलावडे ले आऊट, पडोळे हॉस्पिटलजवळ) असे आरोपीचे नाव आहे. वस्तानी यांच्या मालकीचे शंकरनगर येथे दास ज्वेलर्स नावाने दुकान आहे. त्यांचे काका चंद्रकांत वस्तानी, चुलत भाऊ चेतन वस्तानी व ओजस वस्तानी भागीदार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुलकुमार हा १३ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांच्या दुकानात आला. त्याने ६ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोने खरेदी केले. त्याचे संपूर्ण पैसे त्याने रोख स्वरुपात दिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो पुन्हा दुकानात गेला व तेथून ७ लाख ८५ हजार रुपयांचे दागिने घेतले. त्यातील ५ लाख ७ हजार रुपये देत, उर्वरित पैसे त्याने काही दिवसांनी देतो असे सांगितले.

त्यानंतर तो सातत्याने त्यांच्या दुकानात गेला. यादरम्यान त्याने सोने खरेदी केले. त्यासाठी त्याने काही पैसे ऑनलाइन आणि पोस्टडेटेड धनादेशाच्या माध्यमातून दिले. त्यामुळे वस्तानी यांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यानंतर राहुलकुमारने १ कोटी ६ लाख रुपयांच्या दागिण्यांची खरेदी केली.

मात्र, त्याचे पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. याशिवाय त्यांना धमकीही दिली. त्यातून वस्तानी यांनी अंबाझरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यावरून अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com