
नागपूर : एका व्यावसायिकाच्या घरून ४७ लाख रुपयांचे दागिने चोरी झाले. ही खळबळ जनक घटना बजेरियात सोमवारी उघडकीस आली. सनी गुप्ता (३९) रा. मारवाडी चाळ, बजेरिया यांचे बजेरिया येथे फर्निचरचे शोरूम आहे. घरी आई वडिल, पत्नीसह ते राहतात. सनी दुकान सांभाळतात. पंधरा दिवसांपूर्वी त्यांची आई बाहेरगावी नातेवाईकांकडे गेली. तत्पूर्वी त्यांनी सोने, डायमंड आणि प्लॅटिनमचे मौल्यवान दागिने तसेच दहा हजार रुपये रोख असा एकूण ४७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल बेडरुममधील कपाटात. पंधरा दिवसांनी त्या घरी परतल्या.