हॅलो... हॅलो... मी बोलू का? काहीच समजत नाही! ऑनलाइन बैठकीत कावकाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हॅलो... हॅलो... मी बोलू का? काहीच समजत नाही! ऑनलाइन कावकाव

हॅलो... हॅलो... मी बोलू का? काहीच समजत नाही! ऑनलाइन कावकाव

नागपूर : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी ऑनलाइन पार पडली. कोण काय बोलत होते, हे कुणालाच समजत नव्हते. या बैठकीत निव्वळ कावकाव सुरू होती. हॅलो... हॅलो... मी बोलू का, असेच शब्द ऐकू येत होते. कोण काय बोलत आहे, हेही समजायला मार्ग नव्हता. हा सर्व गोंधळ पाहता लेखी मुद्दे मांडू देण्याची मागणी अनेक सदस्यांनी केली.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने जिल्हा परिषदेच्या बैठका ऑनलाइन घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शुक्रवारी जिल्हा परिषदेची सभा झाली. बैठकीत कुणालाही धड बोलता येत नव्हते. कुणाचे आवाज नीट ऐकू येत नव्हते. सदस्यांना विषय मांडता आले नाही. अनेकांना तर बोलताही आले नाही. अध्यक्षांनी दिलेले रुलिंगही ऐकू आले नाही.

हेही वाचा: संभाजीराजे हे कायद्यापेक्षा मोठे आहेत का? तातडीने अटक करा

निव्वळ औपचारिकता म्हणून बैठक पार पडल्याची टीका विरोधी पक्षातील सदस्यांनी केली. ही सभा तहकूब करून ऑफलाइन घेण्याची मागणी अनेकांनी केली. मुद्दे मांडता आले नसल्याने ग्रामीण भागातील मुद्यांना न्याय मिळू शकला नाही. विशेष म्हणजे सभेला हजर असलेल्यांपैकी बहुतांश हे जिल्हा परिषदेच्या आवारातच होते.

सभा ऑफलाइन घेण्याची मागणी केली होती. अनेक घोटाळे, प्रकरण बाहेर आले असते. महत्त्वाच्या मुद्यांना बगल द्यायचे असल्याने सत्ताधाऱ्यांनी सभा ऑनलाइन घेतली. यात अनेक अडचणी आल्या. त्यामुळे आम्हाला मुद्दे मांडता आले नाही.
- व्यंकट कारेमोरे, उपगट नेते विरोधी पक्ष, जि. प.

हेही वाचा: भाजप आमदाराच्या घोटाळ्यावर किरीट सोमय्या गप्प का?

सभा ऑफलाइन घेण्याची आमचीही इच्छा आहे. परंतु शासनाच्या आदेशाबाहेर जाता येत नाही. शासनाने परवानगी दिल्यास सभा ऑफलाइन घेवू.
- रश्मी बर्वे, अध्यक्ष. जि. प.

Web Title: Jilha Parishad Online Meeting Confusion Of Members

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..