केसर-ए-हिंद : डॉ. दाजी देशमुख

नागपूर शहरात केसरी हिंद रावबहादूर डॉ. दाजी रामचंद्र देशमुख यांनी दिलेल्या आरोग्याचे योगदान मोठे आहे. ९८ वा स्मृतिदिन. डॉ. दाजी यांचे वडील रामचंद्र त्यावेळी आशिर्गड किल्ल्याचे वतनदार होते.
Kaisar i Hind Dr Daji Deshmukh
Kaisar i Hind Dr Daji Deshmukh sakal
Updated on

नागपूर शहरात केसरी हिंद रावबहादूर डॉ. दाजी रामचंद्र देशमुख यांनी दिलेल्या आरोग्याचे योगदान मोठे आहे. त्यांचा ९८ वा स्मृतिदिन. डॉ. दाजी यांचे वडील रामचंद्र त्यावेळी आशिर्गड किल्ल्याचे (बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) वतनदार होते. दाजी यांचा जन्म २४ जुलै १८५४ सालचा. मात्र, पुढे शिक्षणासाठी त्यांनी नागपूर गाठले. जुलै १८७४ साली नागपूर येथे एकमेव वैद्यकीय विद्यालय रॉबर्टसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. वसतिगृहात राहून वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले. दाजी यांच्या स्मरणशक्तीचे कुतूहल साऱ्यांना होते.

दाजी यांच्या अत्यंत तीक्ष्ण स्मरणशक्तीबद्दल तत्कालीन प्राचार्य डॉ. बेटसन यांनी त्यावेळी अभिप्राय दिला होता. तो असा... ‘I NEVER SAW BRILLIANT STUDENT LIKE DAJI. HE REMEMBERS BY HEART EACH WORD BY WORD ALL BOOKS IN MEDICAL FACULTY.’ याची नोंद आताही आहे. डॉ. दाजी यांना त्यांच्या अलौकिक विद्वत्तेमुळे ११ सुर्वणपदके मिळाली होती. एप्रिल १८७७ मध्ये दाजी यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली. यानंतर त्यांची मेयो हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून नेमणूक झाली. डॉ. दाजी यांना १८१८ मधे मद्रास येथे पाठवण्यात आले. त्यानंतर लगेचच पुन्हा त्यांची दुसरी नियुक्ती अफगाण युद्धात सर्जन म्हणून आदेश आले. ते गेले, परंतु नागपूरला परतायची इच्छा होती. यामुळे त्यांना मेयो रुग्णालयात नेमण्यात आले.

१८८३ साली डॉ. दाजी यांना भंडारा रोड येथील इतवारी परिसरातील महापालिकेच्या डिस्पेनशरीत मुख्य संचालक आणि मुख्य सर्जन म्हणून नियुक्त करण्यात आले. त्याच्या अलौकिक अशा कामामुळे १८९४ मध्ये सेंट्रल प्रोव्हिन्सेस त्यांची कन्सल्टंट म्हणून नियुक्ति झाली. त्या ठिकाणीही अद्वितीय कामगिरीमुळेच त्यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. डॉ. दाजी यांना परत नागपूर येथील इतवारी येथे वरिष्ठ पदावर आमंत्रित करून पदग्रहण करण्याची विनंती करण्यात आली. डॉ. दाजी यांच्या लोकप्रियतेमुळेच तत्कालीन मुख्य आयुक्त म्हणून त्यांची बदली नागपुरात झाली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून डॉ. दाजी यांना १८९५ साली रावबहादूर हा सर्वोच्च किताब अर्पण करण्यात आला.

‘केसर-ए-हिंद’

१९१२ मध्ये लॉर्ड होर्डिग्ज यांच्या हस्ते नागपुरात केसर-ए-हिंद हा किताब अर्पण करण्यात आला. डॉ. दाजी हे राजे रघूजीराव भोसले याचे ‘पर्सनल फिजीशियन’ म्हणून कार्यरत होते. ही नागपुरसाठी सन्मानाची बाब आहे. विशेष असे की, डॉ. दाजी यांनी स्वःखर्चाने इतवारी येथील ‘दाजी दवाखाना’ नागपूर महानरपालिकेला अर्पण केला आणि त्याच ठिकाणी दाजी स्कूलदेखील बहाल केले. डॉ. दाजी यांनी स्वःखर्चाने क्रॉडक टाउन धंतोली पार्क येथे अतिशय सुरेख राजस्थानी कोरीव असे हस्तकौशल्यचे फाउंटन तयार करून तेदेखील नागपूर महापालिलेला अर्पण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com