
नागपूर : कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठेला ''राष्ट्रीय बाजार समिती''चा दर्जा मिळावा आणि शेतकऱ्यांची लूट थांबावी अशी मागणी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून केली. राष्ट्रीय बाजार धोरण आणायचा सरकार नक्कीच विचार करत आहे. कळमना त्या निकषात बसत असल्यास देशमुख यांच्या मागणीचा नक्कीच विचार करू आणि तातडीने सकारात्मक पावले उचलू, असे आश्वासन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.