Nagpur Accident : दुचाकी घसरून पडल्याने चालकाचा मृत्यू, एक गंभीर
Nagpur News : कळमेश्वर-काटोल मार्गावर घोराड शिवारात दुचाकी घसरून पडल्याने सुधाकर नेवारे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे भाचे सूरज राऊत हे गंभीर जखमी झाले आहेत.
कळमेश्वर : कळमेश्वर-काटोल मार्गावरील घोराड शिवारात दुचाकी घसरून पडल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता.२६) रोजी दुपारी एकच्या दरम्यान घडली.