Shivsena Loksabha:'ही जागा शिवसेनेचीच आणि कायम...', खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेच्या जागेबाबत स्पष्ट केली भूमिका

खासदार कृपाल तुमाने चांगले काम करीत आहे. त्यामुळे रामटेकच्या जागेबाबत प्रश्नच उपस्थित होत नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.
Shivsena Loksabha:'ही जागा शिवसेनेचीच आणि कायम...', खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेच्या जागेबाबत स्पष्ट केली भूमिका

Ramtek Loksabha Constituency MP Krupal Tumane: रामटेकचे खासदार कृपाल तुमाने चांगले काम करीत आहे. त्यामुळे रामटेकच्या जागेबाबत प्रश्नच उपस्थित होत नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.


लोकसभेच्या जागावाटपाचा निर्णय महायुतीचे प्रमुख नेते घेणार आहेत. रामटेकची जागा शिवसेनेची आहे आणि ती कायम राहील असा विश्वासही यावेळी खा. शिंदे यांनी व्यक्त केला. रामटेक लोकसभा मतदारसंघात कबड्डी खासदार चषकसाठी ते आले आहेत. उद्या गुरुवारी ना. संजय राठोड यांच्या मतदारसंघात आणि पोहरादेवीला कार्यक्रमासाठी ते जाणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना महायुतीत सहभागी झाल्यानंतर रामटेक लोकसभेचा प्रश्न निर्माण झाला आहे. खासदार तुमाने येथून दोन वेळा विजयी झाले आहेत. हा मतदारसंघ भाजपला हवा आहे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तशी मागणीसुद्धा केली जात आहे. त्यामुळे खासदार तुमाने यांना भाजप नारळ देणार असे बोलल्या जात आहे. (Latest Marathi News)

भाजपच्या अनेक इच्छुकांनी येथून लढण्याची तयारी दर्शवली आहे. गाव चलो अभियानाच्या माध्मयातून भाजप हा मतदारसंघ पिंजून काढत आहे. त्यामुळे भाजपच येथून लढणार अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तुमानेच हे आमचे उमेदवार राहतील असे स्पप्ट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Shivsena Loksabha:'ही जागा शिवसेनेचीच आणि कायम...', खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेच्या जागेबाबत स्पष्ट केली भूमिका
Manoj Jarange Health: सरकारच्या आवाहनाला जरांगेंचा प्रतिसाद नाही, आता थेट हायकोर्टानंच विचारलं; औषधोपचारांबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

जागा वाटपावरून महायुतीच मतभेद नाहीत
उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे आणि इतर वरिष्ठ नेते करतात. एकनाथ शिंदे यांनी सर्वांसोबत नेहमीच न्याय केला आहे. जागा वाटपावरून महायुतीच कुठलेच मतभेद नाहीत, असे डॉ. शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. काही लोकांना वेड लागले आहे. (Latest Marathi News)

त्यामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे हेच दिसतात. जेव्हा तुमच्याकडे सत्ता होती तेव्हा काही केले नाही, घरात बसून राहिले. महाराष्ट्रालासुद्धा कोंडून ठेवले होते. आता त्यांचे नेते व पदाधिकारी रोज पक्ष सोडून जात आहे. त्यामुळे टीका केल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहिला नसल्याचा टोलाही डॉ. शिंदे यांनी उद्धव सेनेला हाणला.

Shivsena Loksabha:'ही जागा शिवसेनेचीच आणि कायम...', खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेच्या जागेबाबत स्पष्ट केली भूमिका
Ind vs Eng Playing 11 : अखेर सर्फराज खान अन् ध्रुव जुरेल यांचे पदार्पण! संघात 4 मोठे बदल; रोहितने कोणाला संधी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com