Nagpur Crime: होळीच्या पूर्वसंध्येला तरुणाचा खून; बहिणीला मेसेज केल्याच्या कारणावरून वाद, दोघे गंभीर जखमी

Nagpur News: होळीच्या पूर्वसंध्येला बहिणीला चुकीचे मेसेज केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून नवीन कामठी परिसरात १७ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली.
Nagpur Crime

Nagpur Crime

sakal

Updated on

कामठी : होळीच्या पूर्वसंध्येला बहिणीला चुकीचे मेसेज केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून नवीन कामठी परिसरात १७ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना रविवारी (ता.१) रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com