

Nagpur News
sakal
कामठी : नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत कामठी-कळमना मार्गावर रनाळा शिवारात एचपी पेट्रोल पंपासमोर शनिवार (ता.२१) सकाळी सुमारे १०.४५ वाजता भीषण अपघात घडला. टाटा एस वाहनाने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून दुसरा जण गंभीर जखमी झाला आहे.