Nagpur Crime News: चाकूचा धाक दाखवून भाजी दुकानात धुडगूस ; कामठीत हप्त्यासाठी कामगाराला जीवे मारण्याची धमकी

Knife Threat at Vegetable Shop in Kamthi: कामठीत भाजी दुकानात लोखंडी चाकूचा धाक दाखवत गल्ल्यातील पैसे व मोबाईल लांबवण्याचा प्रयत्न, ‘हप्ता’ न दिल्यास दुकान बंद करण्याची धमकी देत आरोपी फरार
Nagpur Crime News:

Nagpur Crime News:

sakal

Updated on

कामठी: भाजीपाल्याच्या दुकानात जबरदस्तीने घुसून कामगाराला चाकूचा धाक दाखवत धुडगूस घालण्याचा आणि हप्त्याची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. शनिवारी (ता. २०) दुपारी पावणेचारच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी आरोपी शारिक कुरेशी ऊर्फ आबू (वय ४०, रा. मदन चौक, कसाई मोहल्ला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com