नागपूर : आपला कवितासंग्रह वेगळा आणि अप्रतिम असावा, या एका भावनेतून कवयित्री आरती झोटिंग यांनी ‘मनकवडसा’ हा आगळावेगळा कवितासंग्रह साकारला. संग्रहाचे प्रत्येक पान बहुरंगी आहेच; सोबत संगणक न वापरता प्रत्येक कविता हस्ताक्षरात नटली आहे. .सुलेखन पद्धतीने साकारलेला, प्रत्येक कवितेत वेगळी अक्षरे, छायाचित्रे एवढेच नव्हे तर तब्बल ११० कवितांना समर्पक, साजेशी अक्षरांची कॅलिग्राफी एवढ्या बारकाईने साकारलेला मराठी काव्यविश्वातील हा पहिलाच कवितासंग्रह असावा. विशेष म्हणजे हा संग्रह साकारण्यासाठी कवयित्रीने मोठा खर्चही करीत हौसेला मोल नाही, या ओळींची प्रचिती दिली..समाजिक जीवनात वावरताना आपल्या अवतीभवतीची अनेक पात्रं, वस्तू, निसर्ग एवढेच नव्हे तर मुके जीवसुद्धा आपल्याला खुणावतात. नोकरीपेशात असलेल्या कवयित्री आरती झोटिंग यांचे संवेदनशील मन अशाच अनेक गोष्टी अचूक हेरायचे. त्यावर सतत विचार करून मनातून आलेले शब्द त्या नोंदवून ठेवायच्या. या नोंदींचा कवितासंग्रह व्हावा, अशी इच्छा इतरांप्रमाणे त्यांचीही होती. परंतु, आपल्या आठवणींचा ठेवा जरा हटकेच असावा हा त्यांचा आग्रह..कवितासंग्रहाबद्दल त्या सांगतात, घरावरील कौलारूंमधून येणारे प्रकाश किरण म्हणजे कवडसा. त्याचप्रमाणे ह्रदयाच्या भावकौलारू छतातून अमर्याद आभाळातील जी काही किरणं झिरपत गेली तीच कागदावर कवडसे होऊन उमटली. व्यक्त व्हावे ते लेखणीतूनच या प्रेरणेतून हा ‘मनकवडसा’ साकारला. पती अशोक झोटिंग यांनी माझ्या कविता लेखनाला कायम प्रोत्साहन दिले. प्रत्येक गोष्टीत त्यांची समर्थ साथ हीच माझ्यासाठी जमेची बाजू ठरल्याचे कवयित्री सांगतात..कॅलिग्राफीतून साकारलेली प्रत्येक कविता वाचाकांना आकर्षित करते. देव, पाऊस, मुलगा, मुलगी, पती, मैत्रिणी आदींवर लिहिलेल्या कवितांमध्ये त्यांचीच छायाचित्रे टाकण्याची किमया या अंकात साधण्यात आली. मूळचे पुण्याचे असलेले सुलेखनकार सिद्धू चिलवंत यांनी प्रत्येक कविता वाचून त्याला साजेसे सुलेखन केले. ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भारत ससाणे यांची प्रस्तावना संग्रहाला लाभली असून, प्रभाकर तांडेकर यांनी मलपृष्ठावरील अभिप्राय लिहिला आहे..Premium|Hair Care : हार्ड वॉटर आणि हेअर फॉल.साहित्याची विद्यार्थिनी नसले तरी महाविद्यालयीन जीवनात कायम काहीतरी लिहावेसे वाटायचे. मनातली इच्छा कधी मैत्रिणींकडे तर कधी कुटुंबीयांकडे व्यक्त करायचे. त्यांच्याकडून सतत प्रोत्साहन मिळत गेले. मल मनातली कालवाकालव कागदावर उमटू लागली. सुलेखनातून साकारलेला हा पहिला कवितासंग्रह असावा.- आरती झोटिंग, कवयित्री.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.