Nagpur News: खेडी शिवारात भीषण आग; शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत कष्टांची राख; गावकऱ्यांच्या प्रयत्नांनी वाचले गाव

Farmers Watch Their Hard Work Go Up in Flames: गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे मोठा अनर्थ टळला आणि गाव वाचले. अग्निशमन दल आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

कन्हान: पारशिवनी तालुक्यातील खेडी (खोपडी) गावालगत शुक्रवारी (ता.२७) दुपारी लागलेल्या भीषण आगीने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण करत सुमारे ५० एकरांतील गव्हाच्या काडीकचऱ्याला भस्मसात केले. वाऱ्याच्या जोरावर ज्वाळा गावाकडे सरकू लागल्याने संपूर्ण गावात भीतीचे सावट पसरले. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या कष्टांची राख होत असल्याचे हृदयद्रावक चित्र यावेळी पाहायला मिळाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com