
नागपूर : कन्यादान, सप्तपदी हा हिंदू विवाह पद्धतीमधील सर्वांत महत्त्वाचा विधी आहे. लग्नादरम्यान हा विधी न केल्यास एखादा विवाह पूर्ण होत नाही. त्यामुळे, या विधीशिवाय असलेले नाते आणि समाज मंदिरांमधून मिळवलेले विवाह नोंदणी प्रमाणपत्र अवैध ठरेल, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले. तसेच, भंडारा येथील कौटुंबिक न्यायालयाने दिलेला घटस्फोटाचा निकाल रद्द ठरविला.