
हिंगणा : नागपूर व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील बोर अभयारण्यात कॅटरिना व ‘टी ८’ या वाघांच्या जोडीला दोन बछडे झाले आहेत. जंगल सफारीदरम्यान अनेक पर्यटकांना कॅटरिना दोन बछड्यांसह जंगलात फिरताना दिसली. यामुळे पर्यटकांना कॅटरीनाची भुरळ पडली आहे. या अभयारण्याच्या अडेगाव प्रवेशद्वाराजवळ जंगल सफारीसाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.