Nagpur Accident: दुचाकीच्या धडकेत पायी चालणाऱ्याचा मृत्यू; पती-पत्नी जखमी
Nagpur News: कोंढाळीतील कथियावाड ढाबा समोर दुचाकी अपघातात धनंजय यादव यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झालेत. महामार्ग पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
कोंढाळी : कोंढाळी,- कथियावाड ढाब्या समोर झालेल्या दुचाकी अपघातात पायीचालणाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.२२) दुपारी ३ ते ३.३० सुमारास घडली, दुचाकीवरील पती पत्नी जखमी झाले आहेत.