.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
खापरखेडा : खापरखेडा परिसरात दिवसेंदिवस लुटमार, चोरीच्या प्रकरणात वाढ होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शुक्रवारी भरदिवसा अण्णा मोड खापरखेडा येथे एका एचपी गॅस सिलिंडर डिलिव्हरी बॉयचा गळा दाबून आरोपीं तीस हजार रुपये घेऊन पळाले. अखेर स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण एलसीबी पोलिसांनी अवघ्या तीन तासांतच आरोपीला शोधून मुसक्या आवळल्या.